Skip to main content

प्रेम

प्रेम ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. जिचे शेअर्स साऱ्यांकडे असतात आणि जवळपास यात सारेच घसरलेले असतात. ब्रँड होईपर्यंत काम करणं तसंच खरं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी अलंकारिक वागणं , बोलणं बाळगणं. विश्वास मिळेपर्यंत . मात्र त्यानंतर दोघांनाही नात्याची वॅलीडीटी माहिती नसते. बहुतेकदा प्रेमात एकच चुकीचा असतो. तो म्हणजे अपेक्षा ठेवणारा. अपेक्षा ठेवणारा जगाच्या वैचारिक पातळीवर मुर्ख असतो. तसाच तो मनातल्या मनात बोलत खिडकी लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण दुर्दैवाने ती जाम झालेली असते. एक इंग्रजी शिवी एका सेकंदात देऊन तो पुन्हा बेडवर पडतो. पान दुमडलेले एक पुस्तक साईडला आहे. जवळ एक कोरी नोटपॅड कोरीच फडफडत आहे. बाहेर पडलेले तीव्र ऊन घरातल्या सिलिंग फॅनला पुरून उरलेले आहे. अंगावरच्या बनियानच्या खालच्या पंक्याने तो कपाळावरचा घाम पुसतो आणि कालचं बैजवार आठवू लागतो.
तू प्रेम करायच्या लायकीचाच नाहीस , तुला प्रेमाचा अर्थ तरी कळतो का ? असं म्हणत त्याला काहीही एक बोलू न देता ती ताडकन निघून गेली. त्याचे मात्र पाय तिथेच जड झाले. दोन वर्षात तिच्याकडून हे पहिले आणि शेवटचे एकांगी भांडण होते. कदाचित हेच का कारण नसावे ? रोज उजडणारे गोड दिवस पाहून तिला कंटाळा का आला नसेल? जगातला प्रत्येक व्यक्ती सहानुभूतीला आसुसलेला असतो . पण जास्तीची सहानुभूती ही प्रेमापेक्षा मोठी असते या गैरसमजात तीने त्याला कॅज्युएल ट्रीट केले. तसं प्रेम नावाचा अंधार त्या दोच्या डोळ्यापुढे पसरू लागला. रूममध्ये कित्येक तास दुचागती होऊन बसलेल्या त्याला खिडकीत झालेली रात्र फिकी वाटली.

Lakhan jotiram chaudhari
7875326241

Comments

Post a Comment