दुमालं आज दहा वर्षे झालीयत त्या गोष्टीला पण माझ्या नकळत्यापणात झालेले व्यवहार आणि नैसर्गिक प्रकोप या गोष्टींची भिती आजही ठळकपणे आहे. २००८ च्या उतरा आणि हात्तीच्या अवकाळी पावसानं घराची पाठभिंत पाडली. मी नुकताच दहावीत जाणार होतो. वडिलांची तितकी मदत होत नव्हती. त्यांच्या दारुमुळं. आयनं गळ्यातला सर गहाण ठेवला आण भिताडाला पैसं उचाललं. हाय त्याच घराच्या तोड्या वापरून पांढऱ्या मातीत माचून घेतलं. शिमेटाचं करायला दातावर आमच्या तेवढं मास नव्हतं. घराला माळी असल्यानं घर उगाच मोठं वाटत होतं म्हणून चारी भिंती दोन दोन हात उतरून घेतल्या. नवीन बॅटन वापरून कवलं झाकून घेतली. कामापुरतं राह्याला झालं होतं म्हणून आय म्हणली दुमालं घालायला चार महिन्यानं बघूया. आता पैशी नाहीती तेवढं .घरबांधकामाच्या महिनाभराच्या जंजाळात बापानं चालता बोलता एका रात्री शेवटचा श्वास घेतला. रचलेल्या घराचं कोळसं झाल्यागत झालं. सारंच अडून बसलं व्हतं आता. रडून रडून आयच्या डोळ्याची कोरडी विहीर झाली होती. धीर सोडला हुता तीनं. बहिण तापानं फण...
प्रेम ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. जिचे शेअर्स साऱ्यांकडे असतात आणि जवळपास यात सारेच घसरलेले असतात. ब्रँड होईपर्यंत काम करणं तसंच खरं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी अलंकारिक वागणं , बोलणं बाळगणं. विश्वास मिळेपर्यंत . मात्र त्यानंतर दोघांनाही नात्याची वॅलीडीटी माहिती नसते. बहुतेकदा प्रेमात एकच चुकीचा असतो. तो म्हणजे अपेक्षा ठेवणारा. अपेक्षा ठेवणारा जगाच्या वैचारिक पातळीवर मुर्ख असतो. तसाच तो मनातल्या मनात बोलत खिडकी लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण दुर्दैवाने ती जाम झालेली असते. एक इंग्रजी शिवी एका सेकंदात देऊन तो पुन्हा बेडवर पडतो. पान दुमडलेले एक पुस्तक साईडला आहे. जवळ एक कोरी नोटपॅड कोरीच फडफडत आहे. बाहेर पडलेले तीव्र ऊन घरातल्या सिलिंग फॅनला पुरून उरलेले आहे. अंगावरच्या बनियानच्या खालच्या पंक्याने तो कपाळावरचा घाम पुसतो आणि कालचं बैजवार आठवू लागतो. तू प्रेम करायच्या लायकीचाच नाहीस , तुला प्रेमाचा अर्थ तरी कळतो का ? असं म्हणत त्याला काहीही एक बोलू न देता ती ताडकन निघून गेली. त्याचे मात्र पाय तिथेच जड झाले. दोन वर्षात तिच्याकडून हे पहिले आणि शेवटचे एकांगी भांडण होते. कदाचित हेच का क...